स्व.रामरावजी लाडेकर यांना राष्ट्रसंताच्या विचाराने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

Thu 09-Oct-2025,05:24 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा:वर्धा सालोड (हि.) येथील लाडेकर कुटुंबियांच्या वतीने स्व. रामरावजी लाडेकर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने कार्यक्रम घेऊन श्रद्धांजली वाहिण्यात आली. हा कार्यक्रम राष्ट्रीय प्रबोधनकार ह.भ.प. तुकारामदास घोडे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळ सालोड (हि.) चे अध्यक्ष भगवंत झाडे, सचिव सुधीर वैतागे, वर्धा जिल्हा दुग्ध सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष निळकंठ तडस, शामराव लाडेकर, भिमराव लाडेकर, आनंद लाडेकर, किशोर लाडेकर, किशोर मुडे, पत्रकार संरक्षण समिती म. रा. वर्ध्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदिप रघाटाटे, गुरुदेव सेवा मंडळ बोरगाव (मेघे) चे सेवक दिलीप तडस, गुरुदेव सेवक गायक नरेंद्र तडस, सृजन कॉन्व्हेंट देवळी ची शिक्षिका कु. स्नेहा आनंदराव लाडेकर, स्व. रामरावजी लाडेकर यांचे सुपुत्र व कार्यक्रमाचे आयोजक संजय लाडेकर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. रामरावजी लाडेकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे तसेच सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या गुरुदेवाच्या आसनाचे दिप प्रज्वलन व हारार्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रद्धांजली वर आधारित संतांचे भजन व ग्रामगीतेतील अंत्यसंस्कार या अध्यायाचे वाचन करण्यात आले.

ह.भ.प.घोडे महाराज अध्यक्षीय विचार पुष्प गुंफताना म्हणाले की जीवन हे नश्वर आहे. ज्याप्रमाणे स्व. रामरावजी यांनी समाजाला सदवर्तन करून ईश्वर नाम स्मरणात कसे जीवनयापण करायचे आपल्याला शिकवून गेले. त्याप्रमाणे आपल्याला आचरण करण्याची गरज आहे. भगवंत झाडे म्हणाले की पुण्यशील आत्मा हा सदैव इतराशी वागताना माणूस म्हणून श्रेष्ठ वागणूक देत असतो. आणि म्हणूनच स्वर्गीय रामरावजी पुण्यात्मा ठरतात. त्यानंतर दिलीप तडस यांनी सुद्धा आपले गुरुदेव चरणी विचार व्यक्त केले. सुधीर वैतागे यांनी आपले स्वर्गीय रामरावजी लाडेकर काका खरोखर एक श्रेष्ठ व्यक्ती होते. असे विचार प्रगत केले. त्यानंतर नरेंद्र तडस यांनी 'किती कष्ट सोशिले त्या मायबापाणं पोटच्या पिल्यासाठी, लेकरात पाहतो बाप तो, थकत्या काळाची काठी ठेच लागली जीवाला...' अशा अतिशय हृदयस्पर्शी शब्दात स्वरबद्ध गीत सादर करून श्रद्धांजली अर्पण केली. कु. स्नेहा लाडेकर हिने आपल्या मोठे बाबा प्रति आदरांजली व्यक्त केली. त्यानंतर सामूहिक श्रद्धांजली वाहिण्यात आली तसेच राष्ट्रसंतांची आरती करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संदिप रघाटाटे यांनी केले तर संजय लाडेकर यांनी सर्वांचे आभार मानले. श्रद्धांजली कार्यक्रमाला जेष्ठ समाजसेवक मोतीरामजी टिपले, माजी सरपंच वंदना यशवंत वांदिले, मोठा मुलगा दिलीप लाडेकर, पत्नी गुरुदेव सेविका मीना लाडेकर, मुलगी अर्चना किशोर मुडे, गजानन लाडेकर, विजय लाडेकर, अजय लाडेकर, शिशुपाल लाडेकर, यश लाडेकर, गौरव लाडेकर, कार्तिक लाडेकर, त्यांच्या सर्व स्नुषा, सर्व पुतण्या, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, लक्ष्मी माता महिला भजन मंडळाच्या महिला, लाडेकर परिवारातील सर्व सदस्यगण, आप्तेष्ट नातेवाईक व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. तन मन धनसे सदा सुखी हो, भारत देश हमारा... ही राष्ट्रवंदना व गुरुदेवाचा त्रिवार जयघोष घेऊन साश्रू नयनांनी श्रद्धांजली वाहिन्यात आली.